बाळाचा घास
बाळाचा घास
चिऊ म्हणाली येवू का?
दाणा पाणी देशील का?
कावळा म्हणाला काव काव
देशील का मला अर्धा पाव
जीभ चाटत म्हणाली मनी
दूध हवे मला अर्धा वाटी
हम्मा म्हणते वाजवीत घंटा
वैरण मला टाकशील आता
कोंबडी आली नाचत नाचत
टाक दाणे लांब बसते टीपत
कुत्र्याने लांबूनच उभे केले कान
जेवणाचा बेत आज दिसतो छान
बाळ म्हणाले या सारेजण यारे या
जे जे हवे ते पोट भर खाऊन घ्या
