STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

अण्णाभाऊ ह्रदयात आहे

अण्णाभाऊ ह्रदयात आहे

1 min
35

अण्णा भाऊ च गुणगान, कोटी मुखात आहे

अन् अण्णा भाऊ आमच्या ह्रदयात आहे...


अण्णा भाऊ ची शब्दात वर्णावी काय महती

नाही झाला नाही होणार असा साहित्य रत्न जगती

किर्ती या शाहीराची साऱ्या जगात आहे...।।


अशा महापुरुषांना नसते ते मरण

अण्णा भाऊ चे आम्हा होई रोज स्मरण,

किती ज्ञानप्रकाश त्यांच्या साहित्यात आहे....।।


वाटे सारा समाज माझा आता एक व्हावा

अण्णा भाऊना साहित्य रत्न मिळायलाच हवा,

उठाव यासाठी आता साऱ्या देशात आहे...।।


लेखनीरुपी तलवारी ने केले अण्णा ने वार

किती महान साहित्यिक तो लोकशाहीर,

पुतळा उभा अण्णा भाऊचा त्या रशियात आहे...।।


करू जयजयकार बोला जय अण्णा भाऊ

सारे एकमुखाने कीर्ती अण्णा ची गाऊ,

साऱ्या विश्वाचं तत्वज्ञान त्यांच्या साहित्यात...।।

अन् अण्णाभाऊ आमच्या ह्रदयात आहे...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational