अमावस्या
अमावस्या
टिपूर चांदण्या रातीला
का आठवण तुझी ग आली
मन अंधारल्या वस्तीला
अमावस्या पुन्हा ग झाली
तटातट तुटले नाते
आता हाव का आपलेपणाची
विश्वास नव्हता ह्या मना
आता धाव घेईल कुणाची
एकांत गप्प वावरताना
मनाला धाक मी टाकीला
वळून पाहता क्षणाला
नको हाक ती केल्या चुकीला
सोडवत असता कोडे
आजही क्षणाक्षणाचे
आठवण येता पुन्हा
तुडवत रान मनाचे..
टिपूर चांदण्या रातीला
काय आठवण तुझी ग आली
मन अंधारल्या वस्तीला
अमावस्या पुन्हा ग झाली

