अहो ऐकलंत का?
अहो ऐकलंत का?
अहो ऐकलंत का???
भाजी पोळी किती खाल
म्हणला होतात न मला
उद्या हॉटेलला न्याल
पनीर बिनीर नको मला
तांबडा रस्सा खाऊ की
पगार झाली तुमची चला
आज उडवून येऊ की😅
बर मला दुसरं काही नको
तुम्हाला शर्ट नवा घेऊ की
सोबत मॅचिंग नको का दिसायला
म्हणून साडी दुकानात जाऊ की
रंग हवा फ्रेश एकदम
बाकी तुमच्या मनाने बघा
मी कुठं म्हणते बर...
काळा नको स्काय ब्लू बघा
तुम्हीच म्हणता आवड माझी
आहे एकदम कडक
म्हणून म्हणते लाल रंग
घेऊ नका दिसतो भडक
गाडी घेतो म्हणला होतात
गिफ्ट मला देतो म्हणून
वाढविदवस गेला केव्हाच
लग्नवाढदिवसाला देता का आणून???
अहो ऐकलत का???
तुम्ही म्हणाल तशी वागेल मी
फक्त म्हणू नका कधीच की
सकाळी लवकर केव्हा जागेल मी😂
सासू बाईंना म्हणते आई
सासर्यांना म्हणते बाबा
एवढं केलं म्हणजे हवाच ना
घरावर माझाच ताबा???
अहो ऐकलंत का???
नवी आली आहे पद्धत म्हणे
लग्नाआधी फोटोशूट ची
चला ना आपण घालून करू
घागरा अन सूट बूट शी
अहो ऐकलंत का?????
गेलात का परत रुसून
नका असं तंग करत जाऊ
कोपऱ्यात फुगत बसून...
