मधाळ वाणी
मधाळ वाणी
तू जनतेस का मला
बोलले कोणी तरी
बावरून बघता मी
धडधडले माझ्या उरी...
काय बघते तिकडे
राहतो मी अंतरी
तुझाच भाग मी
का होतेस बावरी
अगं! शब्द मी...
तुझ्या मनातले
कसे नाही तू
मज ओळखले
दर्शवितो भावना
अन जाणतो अर्थ
कधी कटू, कधी सौम्य
नसे माझा त्यात स्वार्थ
मी तर माध्यम एक
बोलके करतो मन
शब्द म्हणजे मोती
जपून वापर हे धन
कधी कट्यार होतो
कधी होतो मी सुमन
उच्चारता मला
बदलतो प्रत्येक क्षण
सांगायला आलो मी
जपून मला वापर
रुतता मनास मी
फुटेल तुझं खापर...
मी येतो मुखावाटे
घेऊन मनाचे बोल
अर्थ निघता वेगळा
नाही उरत समतोल
गुंफाया घे मला
गोड मधाळ वाणी
शब्द म्हणजे मोती
सजवू जीवन स्वरांनी...
