वादळे
वादळे
वादळे आली
तशी गेली पण
मी असवांत न्हाले
अन सावरले पण
मी खचले
तशी स्थिरावले पण
मी हरवले
अन सापडले पण
मी साथ दिली
तशी सोडली पण
मी गुंतले
अन सुटले पण
मी अनुभवले काही
तशी विसरले पण
मी माझी झाले
अन नाही पण
