मूलमंत्र
मूलमंत्र
शरीर स्वास्थ उत्तम
मूलमंत्र जीवनाचा
योग, ध्यान करावे
उपाय निस्तेज मनाचा
वाढता वजन जरासे
ठेवावे आहारावर ध्यान
चरबीमुळे होतात आजार
असावे त्याचेही ज्ञान
नको आळस अंगी
रोज व्यायाम करावा
फळांमुळे वाढेल
रोगाशी आपला दुरावा
हालचाल करावी नेहमी
हसावे खदाखदा
आनंदी असता मन
समाधान लाभेल सदा
वाढते शरीर देई
आमंत्रण लठ्ठपणाला
घेता योग्य काळजी
फरक दिसेल डोळ्याला
निरोगी स्वास्थ कुंजी
आहे निरोगी मनाची
त्यासाठी भासते आहे
गरज फक्त शिक्षणाची
