STORYMIRROR

Kavita Pimpre

Comedy Children

3  

Kavita Pimpre

Comedy Children

अंतराळ

अंतराळ

1 min
187

(PROMPT - 2 साठी कविता)


अचानक काय चमकले

ते बघा वर आकाशात

यंत्र आहे की काय कळेना

गोलाकार ते आभाळात


निळेनिळे दिसते अन

प्रकाश पडतोय खाली

अश्या काळोख्या रात्री

ही कोणती जादू झाली


जाणवली हालचाल

त्या ठिकाणी कोण आले

सोबत होते माझ्या मित्र

ते सारे पळून गेले


धसकी असता मनात

उत्सुकतेने दिली साथ

डोकावले मी हळूच

ते खुपजण होते एकसाथ


एलिअन्स अवतरले इथे

अचानक पृथ्वीवर कसे

सत्य असता ही मला वाटे

मी स्वप्न च बघतेय जसे


अंतराळात जावे वाटे

त्यांच्या सोबती मला

एकजण जवळ येता

चल मग मित्रा म्हणाला


मी झालो तयार जाण्या

अंतरीक्षी कपडे नेसले

मित्र माझे खालून बघा

जोरजोरात मला हसले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy