ज्ञान
ज्ञान
शिकाल तर शिकाल
हा धडा असू द्या ध्यानी
उच्च शिक्षणासाठी
लढा द्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी
विद्यार्थी असतो पाया
समृद्ध शा देशाचा
शिकून मोठे होण्यासाठी
हात धरा अभ्यासाचा
गुण नाही महत्वाचे
महत्वाचं आहे ज्ञान
शिक्षणाची गोडी असता
मिळेल योग्य तो सन्मान
ज्ञानाच्या जोरावर
बदलेल सारं जग
धरा पुस्तक हातात
उशीर कशाला मग
कोणी होई शास्त्रज्ञ
कोणी पाककलेत पारंगत
कोणी होऊनी वकील
योग्य ठरवेल आपले मत
वैद्य, पोलीस, फार्मासिस्ट
नर्स, कोणी अधिकारी
कुठल्याही क्षेत्रात जाता
घे तू गगनभरारी
देश घडविण्यास हात
असतो साऱ्या क्षेत्र वर्गाचा
कष्टाला मिळते फळ
हाच नियम निसर्गाचा
