काव्यमाळ
काव्यमाळ
1 min
84
जाणवले मज नेहमी
लेखणीची साथ मला
तिच्या सवे प्रत्येक क्षण
जातो अलगद गंधाळला
बोलकी वाटते कधी
कधी वाटे शांत कशी??
न सांगता ओळखते
शब्दांचे मोती जशी
वेचते ती भावना
माळते काव्यमाळ
नाते घट्ट आमचे
तिच बांधील नाळ
शब्द मांडते मोत्यासम
अलगद हाताळते त्यास
भाळतो त्यावर वाचक
वाचता भावनिक सुवास
चढउतार ती जाणते
शिंपल्यात शब्द ठेवते
आकार देऊन त्यास
काव्यात योग्य विणते
