पिकनिक
पिकनिक
चल रे चिंटू
येतो का पिकनिक ला?
नको नको मनू
बागेत पाणी घालायचे मला...
चिंटू राहिला घरी
पाणी झाडांना घालायला
फुलझाडे वेली
यांच्याशी थोडं खेळायला
आईने सांगितले होते
झाड आपले मित्र
जपा त्यांना सत्यात
नका काढू नुसते चित्र
पटलं त्याला म्हणणं
गेला तो घरच्या बागेत
बोलू लागला फुलांशी
उभे टाका एका रांगेत...
गुंग झाला चिंटू
घालण्या झाडांना पाणी
झेंडू, मोगरा, गुलाब
जास्वंद अन रातराणी
फुलपाखरू दिसता
चिंटूला वाटले नवल
म्हणाला हुशार झालो मी
मीच येणार अव्वल
दिवस छान गेला
आई मी आता थकलो
सांगू का ग तुला
मी काय काय शिकलो...
तिकडे मनू गेली
पिकनिकला राधा संगे
मज्जामस्ती सोबत
चालले होते दंगे
छान असा निसर्ग
त्या न्याहाळू लागल्या
डब्बा आणलेला घरून
खाऊन जरा झोपल्या
मांजर होती सोबत
ती लागली घुरू
ह्या दोघी हसत म्हणाल्या
मंजी काय ग तुझं करू....
सायंकाळी चिंटू
भेटला राधा, मनूला
झाल्या गप्पागोष्टी
मिस केलं म्हणे दिनूला
दिनू त्यांचा मित्र
गेला होता परगावी
चिंटू फोन करून
त्यास लागे बोलावी
असा हा रविवार
आनंदात साऱ्यांचा गेला
तिघे म्हणाले का बरं
उद्या जायचे शाळेला
