मदतीचा हात
मदतीचा हात
कोणी लोळतो पैशात
चालतो ऐशो आराम
काम न करता मिळवतो
भरपूर असा दाम
सुख नाही धनात
ना मोठेपणाच्या दिखाव्यात
समाधान समजण्या
अहंकार नसावा स्वभावात
असता श्रीमंती जवळ
नको गर्व कसला मनी
सतत करावे दान धर्म
व्हावे मदतगारांचे ऋणी
आसपास दिसता गरिबी
माणुसकी दाखवावी
ना उच्च निच कोणी
समानता पसरवावी
मदतीचा द्यावा हात
संकटात द्यावी साथ
धनाने नव्हे मनाने श्रीमंत
व्हावे साऱ्यांनी एकसाथ
अन्न पाणी जपून वापरा
मिळते सारे नशिबाने
भुकेल्याला अन्न देता
तहानलेल्याला तृप्त करावे पाण्याने
दोन वेळची भाकर न लाभे
अशी आहेत कित्येकजण
रोजगार द्यावा वा करावे दान
यातच आहे शहाणपण
