पैसा
पैसा
एकटाच आला होता
एकटाच जाणार आहे
कितीही कमावला पैसा जिवंतपणी
मेल्यावर तु रिकाम्या हातीच जाणार आहे
कितीही कमावली संपत्ती
मेल्यावर कामी येतं नाही
गर्व करुन कायम पैशाचा
माणूसकी शिल्लक राहत नाही
पैसा पैसा करुन आयुष्यभर
माणूस माणसांत राहत नाही
दुरुपयोग करून पैशाचा
खरेपणा सिद्ध होत नाही
नियतीचा हा सारा खेळ आहे
कुणी श्रीमंत तर कुणी भिकारी आहे
प्रत्येकांचा काळ येतच असतो
फक्त त्याला ठराविक वेळ आहे
