पिकं डोलतंय शेतात
पिकं डोलतंय शेतात
ओसाड पडलं माळरान
चोहीकडे उन्हाचा कहर
भेगा पडल्या धरणीला
जसा दुष्काळाचा जहर
सुकुन गेली झाडे सारी
ना हिरवाई राहिली
पाण्याविना माणसं
तडफडू लागली
दुष्काळ सरला आता
अलया या पाणि
अवकाळी पावसाने
झालीया हानी
बिज पेरलयं आता
धरणीच्या कुशीत
वाऱ्याच्या तालावर
पिकं डोलतंय खुशीत
आनंदी आनंद
मावेना गगनात
खुप दिवसानं
पिक डोलतयं शेतात
