जन्म मरणाचा फेरा
जन्म मरणाचा फेरा
तारुण्यात माणसाने
माज पैशाचा करु नये
कुणी नसतं कुणाचं
हेच मात्र सत्य आहे
दिवस बदलतात प्रत्येकाचे
वृध्दांना हिनवू नका
कर्माने सोडलंय कुणाला
हे तुम्ही पाहिलंय का...
जन्म मरणाच्या फेरा हा
कधी कुणाला चुकलाय का
सांगा ना रे मित्रा तू
नेहमी तरुणच राहणार का...
