STORYMIRROR

कवी:- ए. आर. थोरात

Others

3  

कवी:- ए. आर. थोरात

Others

परी

परी

1 min
135

रहस्यमय गोष्टी ऐकून ऐकून

पऱ्या ना कधी समजल्या

कथा वाचल्या बऱ्याच परंतु 

परीकथा नाही उमगल्या


खोट्या खोट्या कथांवर

आता विश्वास बसत नाही

अवास्तव रहस्यमयी घटना साऱ्या

वास्तव मात्र काहीच नाही


काल्पनिक या कथांमुळे

परीकथाच आता राहिल्या नाही

पऱ्या नव्हत्याच अस्तित्वात

म्हणून आता परीकथाच कुणी लिहीत नाही 


साहित्याला गुण द्या
लॉग इन