हायब्रीड जेवण
हायब्रीड जेवण
हायब्रीड झालं जेवणं सारं
ना पौष्टिक काही राहिलं
ज्वारी बाजरी च्या जागी
फास्ट फूड मात्र राहिलं
पिझ्झा, बर्गर सारखं जेवण
आता ऑनलाइनच भेटू लागलं
माणसं पडली आजारी अन्
दवाखान्याचं बिल मात्र वाढू लागलं
माणसांमागून माणसे
दवाखान्यात जाऊ लागली
दवाखान्यात मात्र बेडवर
आता गर्दी कायम दिसू लागली
