STORYMIRROR

Sarika Jinturkar

Action Inspirational

4  

Sarika Jinturkar

Action Inspirational

स्त्री

स्त्री

1 min
212

आयुष्याच्या सुख दुःखातील कणाकणातून घडणार

आकाशाला गवसणार स्त्री नावाच 

अस्तित्व वादळातही तारणार  


विश्वासाचा किनारा घेऊन लाटांना मागे सारणार डोळ्यातल्या आशेला

 निर्मळपणे साकारणार

 अखंड जिद्दीतून आपल्या घरातल्या सगळ्यांची स्वप्न पूर्णत्वास नेणार

आयुष्यातील प्रत्येक 

अडथळ्यांवर मात करणार

" घराला घरपण व प्रसन्नता'" देणारं

 प्रत्येकाच्या आयुष्याला अर्थ 

प्रत्येक क्षणी मायेचा आधार देणार 

आपल्या कर्तृत्वानी, प्रेमानी अवघ 

विश्व व्यापून टाकणार 

 सृष्टीतील सृजनशील रचना कृती 

म्हणजे "स्त्री व्यक्तिमत्व"


 खरंच तुझ्याशिवाय सव॔त्र अपूर्णता

 तूच आहे खरी जीवन सरिता 

 सर्वांना अगदी सोप्या पद्धतीने जीवन जगायला शिकवते

परिस्थितीवर मात करित स्वतः हिंमत करून जगते

 कधी भासते साधारण व्यक्ती 

रूप पाहिले तुझे जसे आदिशक्ती 

पाहावी विशेषता तुझ्या मधली सहनशक्ती  

कारण आजवर समाजाने दडपलेली 

तूच आहे ती अभिव्यक्ती 

ज्ञानाचा प्रसार करणारी तू विद्या

 शब्दातून जिवंत कशी आहे तू कविता 

शिक्षण मान-सन्मान हक्क अस्तित्व समानता यासाठी जगभरात स्वाभीमानाने 

लढलेली तूच आहे रणरागिनी  

साहित्याचे जल वाहणारी आहेस तू सरिता 

वेदनांना ही लाज वाटावी 

अशी तुझी सहनशीलता  

आजच्या युगाच्या प्रगती करता 

प्रयत्नांना लाभलेल्या उन्नती करता

 प्रत्येक कार्यपूर्तीस नेण्याकरता असते

 नेहमी तुझी ग्रहण दृढता

 स्वतःला झिजवतेस होऊनी चंदन

 प्रेमाच्या सुगंधाने जपतेस तु प्रत्येकाचे मन 

सगळ्यांना आपलेसे करते

 प्रेमाचे धागे ही तुज जुळविते  

वेगवेगळ्या नात्यांमध्ये सुद्धा एकरूपतेने सामावतेस 

जपणूक नात्यांची नेहमीच खेळ असतो तुझ्या युक्तीचा

 बहु रूपात वावरतानाही नसतो कधी भाव तुझ्या शक्तीचा

अभिमान म्हणूनच नेहमी वाटतो मला "स्त्री शक्तीचा



Rate this content
Log in

Similar marathi poem from Action