STORYMIRROR

Pandit Warade

Action Inspirational

3  

Pandit Warade

Action Inspirational

पाऊलखुणा

पाऊलखुणा

1 min
14.5K


झिजवले आयुष्य माझ्यासाठी,

केला रात्रीचा दिवस.

झेलले डोईवर

ऊन, वारा, थंडी, पाऊस.

उपसलेत कष्ट

ऊर फाटेस्तोवर!

दऱ्या खोऱ्यातून,

काटेकुटे तुडवत,

वादळवाऱ्याला सामोरे जात फिरलात,

केवळ माझ्यासाठी,

माझ्या सुखासाठी.

उमटवल्यात पाऊलखुणा,

जन माणसाच्या काळजावर!

मी?

विसरून स्वतःचे अस्तित्व

संसारात गुरफटलो,

खोट्याच सुखात लोळत पडलो,

तुम्ही पाहिलंत, कळवळलात,

पाठीवर हात ठेवून जागं केलं,

प्रेमाने जवळ घेतलं, सांगितलं,

'तू सिंहाचा छावा आहेस.

सिंहासारखा जग.'

म्हणून तर निघालोय

पावलावर पाऊल टाकून

स्वप्न तुमचे पूर्ण करण्यासाठी.

तुमच्याच प्रेरणेने

शोधतोय,

काळजा काळजावर

कोरलेल्या तुमच्या

पाऊलखुणा!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action