पहिला पाऊस
पहिला पाऊस


पहिला पाऊस बरसुनी येतो
धो धो तो भूमीवर पडतो॥धृ॥
पावशा पक्षी साद घालतो
काळा ढग नभी दाटतो
मयुर मोर पिसारा फुलवतो
वीजांचा हा कडकडाट होतो॥१॥
गारांमुळे गारवा हा वाढतो
पाऊस मनाला खूप सुखावतो
धरणीला तो ओलीचिंब करतो
मातीचा सुगंध चोहीकडे पसरतो॥२॥
पावसाने अंगावरी शहारा येतो
जुन्या आठवणी जाग्या करतो
धरणीच्या कुशीतून कोंब वर बघतो
नभाकडे तो हळुच डोकावतो॥३॥
निसर्ग हा हिरवाईने बहरतो
मनाला तो बेधुंद करतो
धुलाईत डोंगर उभा असतो
हृदयी दाटून पाऊस हा जातो॥४॥