STORYMIRROR

Sarika Jinturkar

Action Inspirational

4  

Sarika Jinturkar

Action Inspirational

सूर्यास्त

सूर्यास्त

1 min
407

सांज झाली, क्षितिजावर पसरलेले 

सुवर्ण तपकिरी झुंबर

 पसरवूनी दोन्ही हात सूर्यास कवेत घेते जसे अंबर


 नभी झालेल्या निळ्या,लाल केशरी 

रंगांची करीत शिंपण चहुकडे  

आनंदाची, सप्तरंगाची जणू करीत उधळण झुकतो रवी मावळतीला

 धरणी ही कूस बदलते भेटण्यास रजनीला 

 मिटूनी श्वास कळ्यांचा काही 

काहींचा उमलतो ही 

कुसुम गंध हा क्षणी दाटतो दाही


टिपूणी नयनी रम्य हा संध्यासोहळा

 सूर्यास्त वाटतो पर्वणी

 मनातील कोऱ्या भावनांना हाच तर उलगडतो शब्दांनी


 उदय होण्याची दिशा ठरवतो 

अस्त होताना निशात अडकतो

 नित्यनियमाने उगवण्यास 

परत सज्ज होतो  

घडलेल्या गोष्टींसाठी रडत न बसता 

रोज नव्या उमेदीने जगण्याची प्रेरणा हाच तर आपल्याला देतो


अविरत कष्ट करून कर्तव्य 

बजावण्यास सांगतो 

क्षणभर विश्रांती मग घे उंच भरारी 

 थांबला तो संपला हा सृष्टीचा नियम  

मर्म यातले जाणुनी सुखाचा मूलमंत्र आम्हास देतो


तुझ्या पासून खरंच शिकावं 

तुझ्या गुणांना स्वीकारावं

 अस्ताचा शेवट उदयाने होतो हे

नेहमी स्मरणात ठेवाव

 आली संकटे जगी लाख तरीही नेहमी आनंदाने हसतच जगावं


 हे भास्करा..

 तूच तर जगण्याची नवीन नियमबद्धता आम्हास दाखवतो 

 येणाऱ्याला एकदा जायचं जाणाऱ्याला 

पुन्हा नव्याने जन्मायचं 

 पेलत सारी आव्हाने आयुष्याला नेहमी हसतपणे तोंड द्यायचं 

 दुःखा नंतर सुख येईल हा विश्वास

 मावळून जातील निराशा फक्त

 धीर असावा मनात 

 सूर्यास्तानंतर सूर्योदय हे नेहमीे ठेवायचं असतं लक्षात

  

रोजची ही सांजवेळ 

रोजचाच हा निसर्गाचा खेळ 

पाहता आज सूर्यास्तास भुरळ पडली माझ्या मनास घेऊनी मग लेखणी हातात

 कविता करून बघितली ही खास...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action