STORYMIRROR

Shila Ambhure

Action

3  

Shila Ambhure

Action

चिता

चिता

1 min
174

होय .

पेटवलीय मी चिता

तिच्या आठवणींची

नकोत मला तिच्या

स्मृति कोणत्याच

छळती ज्या मला भलत्याच

दिनरात सतावतात मला

विरहात तिच्या

जाळतात मला.

एक नि एक आठवण तिची

माझ्यासाठी सुखद होती

तीच आठवण आता

दुःख देत होती.

म्हणून ठरवलं मी

सगळ्या आठवणीचं गाठोडं बांधायचं

आणि जाळून टाकायचं. 

ढुंकूनही मागे नाही बघायचं.

पण.............

त्या मनाचं काय करू मी?

ज्या मनात ठाण मांडून बसली आहे ती

काढून फेकू का?

याच दोन हातांनी

तिचे केस सावरलेत, 

गजरा माळलाय आणि..........

आणि याच हातांनी तिचा लाजलेला मुखडा ओंजळीत धरलेला.

तेच हात ज्वाळांमध्ये भाजून काढणार  

ज्यांना सवय झाली होती

तिला स्पर्श करण्याची. 

अन् मिठीत ओढण्याची.

काळजात खुपसणार सुरा

अन् काढणार बाहेर त्यालाही

कारण सवय नाही त्याला

तिच्याशिवाय एकाकी जगण्याची.

म्हणूनच पेटवलीय चिता मी

तिच्या आठवणींची.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action