पाऊस
पाऊस
1 min
11.5K
आभाळ ढगाळ दाटुन आले
टिपूर थेंब साठून गेले
बरस पाऊसा वर्षाव कर
तापली धरणी गार कर
पाऊस वारा निसर्ग सारा
कर किलबिलाट उट पाखरा
सुकली झाडी फुटली पालवी
जीवनदान पाऊसा तुझी सर हवी
गर्ज पाऊसा चरा चरा
डोंगर नदी वाहती धारा
धरणी पोटी नवे अंकुर फुटले
पाऊसाने ते वाढू लागले
हिरवी तृण शाल चोहीकडे पसरली
रंग गोमटी धरणी सजली
भिजली पाऊसात धरणी माखली
रांनी बहरले सुगंध वृक्षवल्ली
कडकडाट विज नाद गुमला
धडधडाट पाऊस पडु लागला
तो क्षण वेगळा पाऊसाचा
मज आनंद त्या दिवसाचा