STORYMIRROR

Sunjay Dobade

Action Fantasy

3  

Sunjay Dobade

Action Fantasy

शब्द

शब्द

1 min
14.1K


कवीने राहू नये कुठल्याही भ्रमात

कारण शब्द नसतातच कुणाच्या मालकीचे.


लाळघोटे शब्द जीभेच्या शेंड्यावर नाचणारे

शब्द भाकरीसाठी हाजी हाजी करणारे.


शब्द दाहक; हिंस्र तिरसट

शब्द हावरट; शब्द हलकट.


शब्दांच्या शिव्या घायाळ करतात हत्यार बनून

शब्दच पुजले जातात घरोघरी ओवी म्हणून.


शब्दांचाही कधी कधी जातो तोल

मातीमोल शब्दांनाही येते मोत्याचे मोल.


शब्दांना चढते तलवारीची धार

शब्दांनीच जिंंकता येत जग सार.


स्वर्डमधला स्ट्राँग एस निवडायचा

की वर्ल्डमधला सायलेंट एल

शेवटी चॉईस तुमचाच आहे.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Action