आनंदी आनंद झाला
आनंदी आनंद झाला
दरी डोंगरी,सागर तीरी.
पसरे आभा लाल केशरी.
निशांत बघ झाला.
दहा दिषातूनी रवी किरंनाचा.
नयन रम्य सोहळा.
आज हो आनंदी आनंद झाला !
वाळूवर ती पाय थिरकती.
आनंदाने लोक नाचती.
नसे कुणाला तमाची क्षिती.
आला हो रवी आला. (१).
चमचमती सोनेरी लाटा.
नतल्या सजल्या अरुंद वाटा.
घालुनी सुवर्ण माला. (२). &nbs
p;
आनंदाने हात उंचावून.
रवी राजाला हे अभिवादन.
भान न उरले चाले नर्तन.
विजयानंद जाहला (३).
जणू संपले मरणाचे भय.
गेले विसरुनी जन अपले वय.
दिग्विजयाचा ध्वज सोनेरी.
फडके पूर्व दिशेला. (४).
लवकर येवो तो मंगल दिन.
असो निरामय आमुचे जीवन.
त्या मुक्तीच्या कल्पनेत का.
जो तो रंगून गेला (५).