STORYMIRROR

Priyanka Shinde Jagtap

Action

3  

Priyanka Shinde Jagtap

Action

दुर्मिळ खनिज - पाणी

दुर्मिळ खनिज - पाणी

1 min
314


- दुर्मिळ खनिज - पाणी


नांदी औद्योगिकरणाची

जलविद्युतीकरण प्रकल्प,

जलनियोजन एकच मार्ग

थेंबे थेंबे सागर संकल्प ॥१॥


"वैश्विक द्रावक" हे पाणी

नसतो रंग, नाही सुगंध,

जीवन त्याचे दुसरे नाव

आकाराला नाही निर्बंध ॥२॥


खारे पाणी, गोडे पाणी

शांत वा खळखळणारे,

पावसाच्या सौजन्याने

जमिनीला तृप्त करणारे ॥३॥


निसर्गाचे पलटते रूपडे

दुष्काळाची ही आपत्ती,

द्रव नव्हे, द्रव्य अमोलिक

पाणी हिच खरी संपत्ती ॥४॥


भविष्याचे सुरक्षा कवच

भूगर्भातले खनिज जणू,

पाण्याविना मृत जलचर

पाणी ब्रह्मा, पाणी विष्णू ॥५॥



©प्रियांका शिंदे जगताप, मुंबई

१०/०५/२०१९

प्राॅम्प्ट १०



এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন

Similar marathi poem from Action