आता तरी हो रे शहाणा.
आता तरी हो रे शहाणा.
आपल्या मूर्खपणाचे दाखले देणाऱ्यांचा माज काही जात नाही.
आम्ही आमच्या दुनियाचे राजे, आम्हाला काही होत नाही.
गाडत राहू आमच्या अकलेचे झेंडे, हा प्रण काही सोडत नाही.
चुकांसाठी तर जन्म आपुला, ती एकच करून होत नाही.
अरे मुर्खा कधी मोडून तुटेल तुझा हा भ्रम, हे तुलाच कळणार नाही.
कारण छडी वाजते देवाची तेव्हा आवाज मात्र होत नाही.
मनाचे राजे आपण पण त्याच्या मर्जी पुढे आपलं काहीच चालत नाही.
एक सारखीच वाजते त्याची छडी, त्यात भेदभाव कधीच होत नाही.
आता तरी हो रे शहाणा, अजुनही वेळ गेली नाही.
कृतीत दिसू दे बदल तुझ्या, फक्त बोलून काहीच होत नाही.
