यातनांच्या कहाण्या होताना
यातनांच्या कहाण्या होताना
पुन्हा पुन्हा अस्तित्वाचा
प्रश्न का येतो
केलेल्या कष्टाचा हिशेब का द्यावा लागतो
काय चूक काय बरोबर
दुसऱ्यांनी च का ठरवायचे
मी सतत बरोबर असल्याचे पुरावे का द्यायचे
काय केलंस माझ्यासाठी
असा प्रश्न जेव्हा येतो
तेव्हा, अचानक काळजाचा ठोका का चुकतो
काय आणि कसा मांडावा हिशेब आयुष्याचा
भिजलेल्या अश्रूंचा, थिजलेल्या रात्री चा
काय आणि कशा सांगाव्या वेदना आपल्या
हसऱ्या चेहऱ्या मागच्या लपलेल्या कहाण्या
कुणीही येतो, गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभा का करतो
माझ्याकडे एक बोट, त्याच्याकडे चार हे का विसरतो
वेदना अशी ओठांच्या बाहेर येत का नाही
माझ्या हृदयाची अवस्था कळत का नाही
माझ्या अस्तित्वावर शंका का घेताय
माझ्या भोवतीचे वलय , तुम्हाला का झोंबतय
माझा विजय तुम्हाला खजील का करतो
माझा पराजय ,तुम्ही साजरा का करताय
माझे अस्तित्व तुम्ही नाकारू शकत नाही
कारण भूंकणाऱ्या कडे कधी मी ढुंकून पाहत नाही
