राष्ट्रगान गाताना
राष्ट्रगान गाताना
पहिली माझी ओवी ग प्रिय भारत मातेला,
जिच्या पोटी भाग्यानं च जन्म हा भेटला
दुसरी माझी ओवी ग अमर बलिदानी हुतात्म्यांना,
मातृभूमी साठी ज्यांनी प्राण अर्पण केला
तिसरी माझी ओवी ग भारतीय जवानांना,
मातृभूमी च्या रक्षणासाठी पर्वा मरणाची नसे त्यांना
चौथी माझी ओवी ग माझ्या बळीराजाला
आठवून रक्त जो पोसतो जगाला...
