जयंती महामानवाची
जयंती महामानवाची
नका पिऊ कोणी जयंती दिनी
पाहूया तुमचा आज जोश,
आहे जयंती महामानवाची
राहू द्या रे थोडा होश...
फोटो, पुतळ्यांना घालू या हार
नाचू गाऊ सारे करु जयजयकार,
करु गगनभेदी भीम गर्जना
जयभीम चा जयघोष...
शिकवण भीमाची सारे अंगीकारू,
कोटी कोटी वंदन भिमाला करू,
आज दिन सोनी यांचा
हा आम्हा साठी खास...
जन्मभर फिटणार नाहीत
लई ॠण हे भिमाचे
कैवारी खरे ते दीन दलितांचे
केला उध्दार, बनविले माणूस...
पहा कोण खरे भिमाचे पाईक
घडली ही हिंसा वाटे वाईट,
ठेवा जाण भान गडे
नको हा घडायला विध्वंस...
