आम्ही भारतीय
आम्ही भारतीय
ना जातीयवादी, ना वर्णवादी
ना भेदभाव, ना धर्मवादी
आम्ही सारे भारतीय, फक्त देशहितवादी
ना फितूरगिरी, ना भोंदूगिरी
ना खोटेपणा, ना फसवेगिरी
आम्ही सारे एक, भारतीय नर, नारी
निर्माण करुया राष्ट्र एकीचे
असे आम्ही ध्येयवादी
मिळून मिसळून राहतो एकत्र
आम्ही सारे भारतीय, फक्त देशहितवादी
