रंग प्रेमाचा
रंग प्रेमाचा
भरावयाचा जीवनात
खरा रंग प्रेमाचा,
सजनाच्या हाती हवा
हात सजनींचा..
रंग प्रेमाचा तरच
जीवन ही रंगीन,
प्रत्येकाने जावे
प्रेम रंगात रंगून..
व्हावे समर्पित दोघे
या प्रेमाच्या रंगात,
जगणे मरणे आहे
गात गात प्रेम गीत
फुलवितो जीवन
हा रंग प्रेमाचा,
प्रेमात च आहे
आनंद जीवनाचा...
