ॠतूराज वसंत
ॠतूराज वसंत
ॠतूराज वसंताचे
झाले आगमन खास,
नवी पालवी फुटली
काय फुलला पळस..!
पानगळ सरुनीया
नवे धुमाळे फुटले,
मोहरला आंबा,लिंब
वारे सुगंधी सुटले
पळसाला चढे साज
डोळे दिपूनिया गेले,
मधमाशा फुलांवर
फुलपाखरांचे झुले
तप्त उन्हाचे चटके
आगमन वसंताचे,
बहरली पाने, फुले
चमत्कार निसर्गाचे
