महाराष्ट्र माझा श्रमिकांचा राजा
महाराष्ट्र माझा श्रमिकांचा राजा
महाराष्ट्र माझा
उद्योगांचा राजा
रोजगार देण्यात
देशभर गाजावाजा
महाराष्ट्र माझा
विविधतेत नटला
इथे विठोबाच,भक्त
पुंडलिका भेटला
सह्याद्रीत उगमे
नद्या भीमा कृष्णा
समुद्रास भेटता
तृप्त होई तृष्णा
मुकुटमणी मुंबई
हुतात्म्यांनी राखली
महाराष्ट्राची महती
जगभरात पसरली
