STORYMIRROR

Meena Kilawat

Inspirational Abstract Others

2  

Meena Kilawat

Inspirational Abstract Others

अबला सबलात्री सावित्री

अबला सबलात्री सावित्री

1 min
2.8K


सावित्री माईचे कार्य अती महान

मुलींच्या शाळेला पहिला बहूमान

रचियला अद्वितीय नवा इतिहास 

करुनी स्त्रींयाचे बालकांचे कल्याण....

असह्य वेदना या सोसूनीया 

घेतले अंगावर तू परी निखारे

थंड झाले तुझ्या अंगावरती

नीच विकृतिचे ते डंख सारे......

दिलेस विद्येची फुले तू आंम्हा

प्रथम गुरु स्त्रीजातीची धात्री

शिक्षण दिव्यज्योती लावूनी

तू केलेस या अबलेस सबलात्री......

नेत्रांजन या डोळ्यात घालूनी

स्त्रीमुक्तीची ही पहाट केली

पायातील या बेड्या तोडूनी

या जगती सरस्वती तू झाली.......

 

सोसाट्याचे हे वादळवारे

अगणित वादळे सावरले

लेखणी हाती देवूनी आंम्हा निर्दयी तुफानात गुरफटले........

ज्योत जोतिबांनी पेटवीली

त्यास सदैव तेवत ठेवीली

तिमिर सारूनी प्रकाश आंम्हा

स्त्रीमुक्तीची या ओटी भरली........

दगडांचा मारा तुला देवूनी

शिव्यांचा ताज तुला घालूनी

शेणामातीच्या फुलमाळा तव

सहन तु केले स्वत: झेलूनी.....

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational