आठवण...!
आठवण...!
आठवले मज ते गोड गोजिरे
रूप तुझे ग गोंडस साजिरे
म्हणायचो मी मित्रांना
लेकांनो ती माझी रे, ती माझी रे....
मित्र वेडे असतील कदाचित
भेटवायचे मज तुला अवचित
जिवा भावाची मैत्री आमची
रहावी वाटे मज ती कायमची....
फाटे फुटले मार्ग बदलले
ज्याचे त्यांनी ध्येय गाठले
क्षणभर म्हटले कारे लेकांनो
प्रेम अंतरीचे असे का आटले....
मित्र म्हणती मला लेका
दुरून डोंगर रे साजिरे
गेले बघ ठेंगा दाखवून
गोंडस तुझे ते रूप गोजिरे....
वाईट मज नाही वाटले
नवे विश्व जरी थाटले
कळले मला प्रेम नाही आटले
जरी मज ते क्षणभर मूकले....
आज ही येतात लेकाचे
नाते जोडतात मामाचे
मी म्हटले साल्यांनो
तुम्ही बेटे सारे बिन कामाचे....
एकटा बिलंदर मज म्हणे
नाही जीवनात काही उणे
मरू देत ते जगणे सुने सुने
खरेच चांगले इथले झोपडीचे जीणे...
सौख्य समाधान शांतीची
इथे सदैव असते पडून रास
हेच जीवन आहे बाबा
आपले चिरंतन सुखाचे हमखास....!
