2- काऊ ची मोडली खोड
2- काऊ ची मोडली खोड
आणखी काही दिवसांनी,
चिऊ म्हणे काऊ ला.
दुसऱ्या गावी जाते जरा,
संभाळशील का रे माझ्या घरा.
खूप खुश झाला काऊ,
आता चिऊ च्या घरात जाऊ.
गावाबाहेर गेली चिऊ,
संपवून टाकू सगळा खाऊ.
खाऊ लागला मनात मांडे,
चुलीवरचे दिसले भांडे.
खरपूस लाल पदार्थ मस्त,
खाऊन लगेच करू फस्त.
हावरट काऊ धावत गेला,
उचलून तुकडा तोंडात टाकला.
चोची मध्ये खाऊ घेतला,
ओय ओय ओरडू लागला.
चांगलाच भाजलं त्याच तोंड,
चांगलीच मोडली त्याची खोड.
खाऊचा तुकडा ज्याला समजला,
तो तर जळता निखारा निघाला.
चोच नि जीभ चांगलीच भाजली
हावरे पणाची अद्दल घडली.
चिऊ ताई बघून हसायला लागली,
म्हणाली मस्त खोड मोडली.
हावरेपणाची शिक्षा मिळाली,
काऊ ला स्वतःची चूक कळाली.
लबाडपणा नेहमीच होत नाही पुरा,
ठकास महाठक भेटतो खरा.