STORYMIRROR

Aarya S

Comedy Fantasy Children

2  

Aarya S

Comedy Fantasy Children

1- बिचारी चिऊ

1- बिचारी चिऊ

1 min
110

एक चिऊ चिव चिव,

एक काऊ काव काव.

दोघे होते शेजारी,

राहती एका झाडावरी.


चीऊ ने करून कष्ट,

बांधले सुंदर घर.

काऊ नुसताच आळशी,

राहतो फांदीवर.


आला पाऊस जोरात,

चिऊ बसली घरात.

काऊ फांदीवर बसला,

चिंब चिंब भिजला.


लागला कुडकुडायला,

दरवाजा वाजवायला.

चिऊच्या आली दया मनात,

काऊला तीने घेतलं घरात.


चुलीजवळ जाऊन,

ऊब थोडी घेऊन.

चुली जवळील भांडी,

पाहू लागला उघडून.


भांड्यतली पाहून खीर,

तोंडाला सुटलं पाणी.

गट्टम केली सगळी खीर,

आणि गेला पळूनी.


चिऊ बिचारी फसली,

भुकेलेलीच बसली.

अद्दल चांगलीच घडली,

त्या वरून शहाणी बनली.


आता शहाणं व्हायचं,

नाही फसवू द्यायचं.

आता नाही त्याला सोडायची,

चांगलीच खोड मोडायची.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy