आभाळ कोसळतांना ...
आभाळ कोसळतांना ...
ढगांचा गडगडाट होतो
विजेचा कडकडाट होतो
अनावर भाव मनी दाटतो
वेदनेचा कहर होतो
आभाळ कोसळतांना
चातकाला पेरते व्हा म्हणतांना
कोकीळेला पेरते व्हा म्हणतांना
साधण्या सुवर्णमध्य आकाश धरतीचा
हिरवं स्वप्न उरी दाटते
आभाळ कोसळतांना
हिरवा शाल लेवून धरा
भाळी लावून लाल टीळा
बेभान होवूनी मोर नाचुनी
साद घाली कवी मना
आभाळ कोसळताना
दिसामागुन दिस येईल
आयुष्य सारं सरून जाईल
माणुस माणसाला कळेल तेंव्हाच
जुळ्तील मने परस्परांची
आभाळ कोसळतांना