STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Abstract

3  

Abasaheb Mhaske

Abstract

माझ्यासारखा मीच

माझ्यासारखा मीच

1 min
212

माझ्यासारखा मीच गडे

आठव आश्चर्य गिनीजबुकातून

मीच देव तुमचा भक्तांनो

मी सांगेन तेवढंच करा


वाटलो जरी खास मी

लक्ष्मीचाच दास मी

भव्य दिव्य वागतो मी

लाचार जगणं जगतो मी


बोलघेवडा मी असलो जरी

अर्थ न उरतो काडीचाही

सार जग माझ्यासाठी

मी मात्र नाही कुनाचाही


वाघ मी वाटलो जरी

आतून मी भित्रा ससा

असा मी तसा मी

असणे मी कसाही...


वेड्यानो मी तर अफाट बाबुराव

विका थोडं विकत घ्या मी सांगतो

कशाला हव तुम्हाला खरं-खोटं ?

मी तुमचा भाग्यविधाता, तारणहार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract