Read #1 book on Hinduism and enhance your understanding of ancient Indian history.
Read #1 book on Hinduism and enhance your understanding of ancient Indian history.

Abasaheb Mhaske

Inspirational


3  

Abasaheb Mhaske

Inspirational


अन एक दिवस संपतो तो प्रवास

अन एक दिवस संपतो तो प्रवास

1 min 206 1 min 206

काळानुरूप माणूस बदलत जातो

कळत -नकळत इच्छा असो या नसो

भ्रमिष्ट ,वाट चुकलेल्या पांथस्तागत

निसर्गानं ठरवून दिलेल्या ऋतूमानानुसार


जीवन म्हणजे जगण्या -मरण्याचा अखंड प्रवास

अविरत ,अविश्रांत संघर्षाच अनाकलनीय ध्यासपर्व

कशासाठी जन्मलो, जगलो सर्वकाही अनुउत्तरीतच

तरीही जगणायलाची इच्छा मरते ना मोह , लालच


कालचा मुलगा आजचा बाप होतो तेंव्हा

त्याला कळत आईचं प्रेम, बापाचं काळीज

जस- जस वय वाढत जात ,तसच शहाणपण

वारसान मिळालेलं संस्काराच संचित बरच काही


इवलस रोपटं वटवृक्ष व्हावा अगदी तसच पडत

अपेक्षांचं ओझं, सुटत सुटत नाही आयुष्याचा गुंता

पावलं चालत राहतात अनोळखी आपलं मानतात

अन रक्ताची नाती होतात परके कधी- कधी


सुख - दुःखाची तुडवत नागमोडी पायवाट कधी

शोधताना ती मायावी नगरी अन ती सोनेरी पहाट

राग द्वेष लोभ मोह माया पिच्छा सोडत नाही अंतापर्यंत

कळत देखील नाही अन एक दिवस संपतो तो प्रवास


Rate this content
Log in

More marathi poem from Abasaheb Mhaske

Similar marathi poem from Inspirational