Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Inspirational

2  

Abasaheb Mhaske

Inspirational

पाळणा पुढा-याचा

पाळणा पुढा-याचा

1 min
1.3K


दिसण्यास तशी साधारण व्यक्ती, खर्चून सारी भात्यातील शक्ती

निवडूण येण्यास शोधी नामी युक्ती, शकुनी मामास लाजविणारी कॄती

स्वतःचे मानधन  चौपट घेती, नोकर भरती, कर्जमाफीस  मात्र तिजोरी रिकामी  

हवी असते त्यांना सत्ता नी खुर्ची, निर्लज्जपणाचा कळस हो गाठती

वंदन करूया हो भ्रष्टाचारमूर्ती  जो बाळा जो

रे जो //१//

परीधान करूनी पांढरीशुभ्र वर्दी, सावज टिपण्यास निष्णांत बकदॄष्टी

अधिवेशनाला त्यांची हजेरी नावापुरती, घोषणा दंग्यानं अध्यासास पळविती

निरर्थक गोष्टींवर  गडबड गोंधळ करती कधी, बिनधास्त झोपाच काढती 

क्षुल्लक कारणावरून अधिवेशन सत्रावर बहिष्कार हो टाकती

             घोटाळेबहद्दरांची करुया सुट्टी जो बाळा जो... रे   जो... //२//

आदर्श घोटाळे तर कधी, कोळशाने तोंड काळे हो करती

युरीया, चारा त्यांना ना पुरती, पाहिजे तेवढा भ्रष्टाचार करती

मी नाही त्यातली कडी लाव आतली, वरतून विरोधकांचा कुटील डाव म्हणती

करुया म्हणे भ्रष्टाचारमुक्ती, लोकशाही स्वराज्याच्या गप्पाच मारती, 

शक्तीभावे ओवाळूया त्यांची हो आरती जो बाळा जो... रे जो... //३//

 

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational