मुक्त विहार..!
मुक्त विहार..!
मुक्तविहार...!
साच्यातले गणपती अनेक विद्वत्तेचे
पाहिले जवळून रांगे मध्ये
रांग मोडण्याचे नाही धाडस
मागे पडण्याचे भय मोठे
शर्यत जीवघेणी उगाच पळती
पायी बेडी साच्याची बांधोनीया
मोकळे होऊन पहावे जीवन
गावे कवन मुक्त कंठे
आंनदी आनंद सर्वत्र भरून
पहा जरा एकदा मुक्त होऊन
नको लाज लज्जा नको पायी बेडी
मुक्तानंदात काव्याची खरी गोडी
नाही काढत मी कोणाची खोडी
मुक्त होण्यासाठीच मी हात जोडी....!