बालक
बालक
बालक
आम्ही छोटेसे बालक
किती छान छान छान
करतो आम्ही नेहमी
मोठ्यांचा मान सन्मान
बालकानांच सारख्या
पालकांच्या सुचना
आमच्याही मागण्या
थोड्या तुम्ही ऐका ना
आम्हालाही करू द्यावी
मनासारखी मस्ती
कधीतरी करु द्यावी
दगड मातीशी दोस्ती
नेहरुंजींना आवडायची
छोटी छोटी मुले
नेहरुंजींच्या जन्मदिनी
फुलती बालकरुपी फुले
आमच्याही मागण्यांचा
झालाच पाहिजे विचार
दंगामस्ती सोबत आम्ही
पाळू सारे सारे संस्कार
टिव्ही मोबाईलवर
ठेवू आम्ही ताबा
आम्हचेही लाड कधी
करा हो आई बाबा
देशाचे भविष्य आम्ही
आहे आम्हाला जाण
अभ्यास आणि कर्तृत्वाने
मिळवू जगात आम्ही मान