घेत नाही
घेत नाही
मी कधीही मद्य प्याला घेत नाही।
सोबतीने न्यायचाही बेत नाही।।
टाळले मी बोलणे माझ्या सखीशी।
ती जराही भाव मजला देत नाही।।
पावसाची वाट सारे पाहताती।
पण दया त्याला जराही येत नाही।।
धावशी पाठी धनाच्या तू कितीसा।
संगती कोणी जयाला नेत नाही।।
मोकळे कोठे करावे या मनाला।
प्रेयसी आता इथे समवेत नाही।।
का घडाव्या रोज येथे भ्रूण हत्या।
रोखण्याचे बळ कुण्या मातेत नाही।।
चुंबिले मी ओठ झालो धुंद आता।
जी नशा ओठात ती मदिरेत नाही।।