भेट...
भेट...
प्रिये, तुझी भेट होणे
पुन्हा नशिबात नाही...
तुझ्या आठवणीविना.
काही जिवनात नाही...
सांग काय होता गुन्हा
गेली अर्ध्यात सोडूनी...
नातं आपलं प्रेमाचं
एका क्षणात तोडूनी...
वाटे जाळुनी टाकावी
सारी पत्रे ती प्रीतीची...
करू वाटते गं होळी.
तुझ्या सोज्वळ मूर्तीची...