STORYMIRROR

Dinesh Kamble

Romance

3  

Dinesh Kamble

Romance

भिक्षा

भिक्षा

1 min
424

माझ्या मनाच्या अंगणी 

तुझ्या प्रीतीचे चांदणे

नाते अखंडित राहो 

नाही दुसरे मागणे


पुण्य केले गतजन्मी 

त्याकारणे हे घडले 

माझ्या फाटक्या पदरी 

प्रेम अपार पडले 


तुला जपायची आहे 

मम हृदयी अंतरी 

तुझा रुसवा फुगवा

माझ्या लागतो जिव्हारी 


चुका होतील जीवनी 

साऱ्या विसरून जावे

राग सोडून दोघांनी 

मिठी एकमेकां द्यावे 


तुझ्याविना जिंदगानी

वाटे काळेपाणी शिक्षा 

तुझ्या प्रेमाचा भिकारी 

द्यावी प्रेमरूपी भिक्षा 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance