STORYMIRROR

Gaurav Daware

Drama Inspirational

3  

Gaurav Daware

Drama Inspirational

वेळ आलीय.....

वेळ आलीय.....

1 min
267

आज मी सांगणार आहे एक साधी कहाणी

प्रत्यक्ष एका मनुष्याच्याच जुबानी

डोळ्यात घालून थोडं वंगण आणि पाणी

एकवतो मनुष्याच्या दुःखाची अदभूत वाणी 


एकेकाळी मनुष्य सांगायचा चंद्राची कहाणी

काहीवर्षात तो पोहोचला तिथे शोधायला थोडं पाणी

तेथूनच त्याने चालवली आपली कर्तृत्वाची वाणी

अन पूर्ण वेळ कामात देऊन तो झाला मोठा ज्ञानी


वेळ कामात देऊन त्याने जग जिंकलं युद्धातुनी

आणि तो झाला मोठा श्रीमंत पटकनवानी

पण इथेच त्याची बाजू थोडी चुकली कामातूनी

पूर्ण वेळ कामात देऊन शरीर झालंय भुसाहुनी


संपूर्ण वेळ कामात जणू काम मोठं ईश्वराहुनी

रात्रंदिवस काम करून शरीर फूटतय चहूबाजूनी

याला म्हणावा वेडेपणा की काय आनंद यातूनी

शरीराची निगा राखा जरा तिची ओळख थोडी जाणुनी 


आता मात्र जागायला हवं नाहीत वेळ निघेल हातूनी

राहील इथे केवळ आत्मा शरीर जाईल कुजवाचुणी

पोकळवसा होईल त्याचा काय अर्थ रात्र जागुणी 

महत्व देऊ शकतो त्याला फक्त त्याची किम्मत राखुनी


व्यायाम आहार अन् झोप आहे खरे औषधपाणी

तिच शरीराची खरी गरज जणू आहे संतांची वाणी

आपली काळजी आपलीच, नको ठेवू नोकर ज्ञानी

काळजी घे स्वतःची हीच आहे तुझी खरी कहाणी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama