धन्यवाद सर
धन्यवाद सर
5 सप्टेंबर चा एक दिवस आधी एक पत्र हातात पडलं पत्राची सुरुवात धन्यवाद सर या शब्दांनी झाली होती वाचता वाचता मी त्यात कधी रमून गेलो कळलंच नाही माझा एक गुणी विद्यार्थी त्याचं ते पत्र होतं ते वाचता वाचता माझी रिटायरमेंट विसरून मी पुन्हा शाळेत रमलो
वीस वर्षांपूर्वीचाा शाळेतलं वातावरण आठवलं शाळेत बरीच मुलं होती पण त्यातला एक वेगळा विद्यार्थी म्हणजे विठ्ठल. विठ्ठलची बुद्धी अतिशय चाणाक्ष. पोलिओमुळे एक पाय गमवावा लागलेला आणि घरामध्ये सावत्र आईचं असलेलं वास्तव्य यामुळे विठ्ठल थोडासा भांबावलेला असायचा. अभ्यासात मात्र खूप हुशार एक पाटी होता विठ्ठल.
घरामधून सतत शाळा सोडण्याचा तगदा लावलेला असायचा. यामुळे विठ्ठल सतत चिंतेत असायचा कोणाकडेे काहीही बोलायचं नाही. एकलकोंडा जणू झाला होता तो .काही दिवस पाहून एक दिवशी मी त्याला एकट गाठून विचारलंच, "काय रे विठ्ठल आजकाल तूू अभ्यासाकडे लक्ष देत नाहीस, शांत शांत दिसतोस काही अडचण आहे का तुला? यावर शांत असलेल्याा विठ्ठल ढसाढसा रडू लागला इतका मोठा मुलगा रडतोय म्हटल्यावर नक्कीच काहीतरी कठीण प्रसंग असणारे हेे माझ्या लक्षात आलं आणि मी त्याला सरळ माझ्या घरी घेऊन गेलो त्याला पहिले शांत केलं आणि मग हळूहळू त्याला पाठीवर हात फिरवत विचारलं तेव्हा तो बोलू लागला," सर माझ्या वडिलांनी दुसरे लग्न केलं आहे आणि माझी सावत्र आई मला पुढे शिकण्यास मनाई करते आहे तिला वाटते मी घरातील, शेतातील काम करावे. तिचे म्हणणे आहे मी ही कुबडी घेऊन पुढे शेतातच काम करणार आहे मग शिकून पैसा घालवून काय उपयोग.
पुन्हाा पुन्हा हुंदके देत विठ्ठल रडत होता त्यालाा शिक्षणाची आवड असल्याने त्याला ही वाट सोडायची नव्हती हेे मला स्पष्ट जाणवत होत. आणि म्हणूनच मी एक निर्ण्णय घेतला ही गोष्ट मी प्राचार्यांच्या कानावर घालून त्याच्या वडिलांना शाळेमध्ये बोलावून घेतलं त्याचे वडील आई दोघेही शाळेमध्ये आले त्यांना विठ्ठलच्या वागण्याबद्दल विचारले असतात त्याचे आई पुन्हा तेच बोलली जे विठ्ठल ने सांगितले होते त्यावर मी कठोर पवित्रा घेत त्यांना ठणकावून सांगितले आणि विठ्ठलच्या शिक्षणामध्ये अडथळा न आणण्याबद्दल त्यांना समजावले तसेच त्याच्या शिक्षणासाठी लागणाराा खर्च आम्ही उचलू असेे सांगितल तेव्हा त्याचेेे आई वडील तयार झाले .
तेव्हापासून विठ्ठल चा प्रवास सुरू झाला जो आज तागायत चालूू आहे विठ्ठल ने आज भारतातील सर्वात मोठा शिक्षक पुरस्कार मिळवला होता आणि त्याबद्दल आपल्या शिक्षकाला कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता हे पत्र पाठवलं होत याहून आणखी मोठं सुख काय असणार
इतक्या वर्षानंतरही जो विद्यार्थी आठवणीने आपल्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आपसूकच माझे डोळे आनंदाश्रुुुनी भरले होते.
