यातना..!
यातना..!
या ना त्या कारणाने
त नाची लाही लाही होते
ना चता येईना
अंगण वाकडे
करू पाहतात
अनेक माकडे
शब्द दुधारी
बोचणी मारतात तेंव्हा
यातना खूप होतात
सुखा साठी धडपडतांना
ही शब्दांची बोचणी कशाला
कास्मिरी शालीच्या उबेत
सुखासीन प्रगतीचे स्वप्न पाहताना
जुनी बुरसटलेली
कंसकल्ल्यांची वाकळ कशाला
मला वाटते नेहमी
सुख स्वप्नांसाठी फक्त असावी
प्रगतीच्या गोड शब्दांची
मऊ उशी सदा उशाला....!
